जामनेर;- जामनेर तालुक्यातील पहूर येथील शिवसेना शहर शाखेतर्फे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म निमित्त निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . आज सकाळी शिवसेना शहर कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात शिवसेना नेते व माजी शहरप्रमुख सुकलाल बारी तालुका प्रवक्ते गणेश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच लोकसभा विधानसभा त्याला भगवा फडकवायचा आहे दिल्ली सुद्धा आपला काबीज करायची आहे. तरी शिवसैनिकांनी जनतेची सेवा करावी शिवसेनाप्रमुखांनी दिलेला शब्द पाळावा तसेच शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे त्यामुळे मतभेद मनभेद न ठेवता शिवसेना मजबूत करावे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करावे असे आव्हान याप्रसंगी केले यावेळी शहर प्रमुख संजय तायडे, शहर संघटक विकास जाधव ,शेतकरी सेना संघटक भाऊराव गोंधनखेडे ,वडाळी शाखाप्रमुख सुधाकर शिनगारे ,रमेश बनकर विभाग प्रमुख दगडू पाटील, अजय जाधव ,पुंडलिक भडांगे, शुभम घोलप ,कैलास जाधव, राहुल जाधव ,मीडिया सेल प्रमुख मुकेश जाधव ,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे तर आभार शहरप्रमुख संजय तायडे यांनी मानले
जामनेर शहरात नगरपालिके जवळ गांधी चौकात जामनेर शहर शिवसेना शहर शाखेतर्फे हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील, तालुका उपसंघटक सुधाकर सराफ, शहर प्रमुख अतुल सोनवणे ज्ञानेश्वर जंजाळ, तालुका प्रवक्ते गणेश पांढरे ,जिल्हामहिला संघटक पुनम बहाटे, जामनेर विधानसभा तालुका महिला संघटक मीना शिंदे ,साधनाताई काळे ,दुसाने ताई, उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण ,कैलास माळी ,भूषण ललवाणी, दिपक माळी ,काशिनाथ शिंदे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेर तालुक्यातील तोरणाळा गावातील ग्रामपंचायत हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तालुका उपसंघटक शामराव पाटील सरपंच युवराज पाटील रामचंद्र पाटील प्रभाकर महाजन सरदार सिंग राजपूत भूषण राणा निलेश राजपूत यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर तालुक्यातील पळसखेडा मिराचे येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन पळसखेडा मिराचे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील तालुका प्रवक्ते गणेश पांढरे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर हडप गण प्रमुख पंढरी शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश सूर्यवंशी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर काळे मधुकर बाविस्कर भूषण चौधरी भारत शिंदे विजय सोनार माजी शाखाप्रमुख रज्जाक शेख सोपान शिंदे जगन भोपळे कैलास राजपूत प्रकाश हडप मानराज हडप राजू बोराडे सुरेश पाटील रमेश भदाणे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी अरुण सावकारे प्रमुख मिस्तरी आधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी शहर प्रमुख भैय्या गुजर विलास पाटील उपतालुकाप्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल सुनील गुजर विनोद नाईक अजय भोई यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







