जळगाव ;– येथील तांबापुर परिसरात एका टपरीच्या बाजूला बसून मटक्याचे आकडे घेणाऱ्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील तांबापुरा परिसरातील मच्छीबाजारात टपरीच्या आडोशाला नईम रहिम पठाण(वय-29, रा. मच्छीबाजार) हा युवक परिसरात चिठ्ठयांवर सट्टा जुगाराचे आकडे घेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पाटील, अतुल वंजारी, इम्रानअली सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने नईम रहिम पठाण याला अटक केली. तसेच त्याची विचारपुस केली असता सलीम मुर्गी यांच्या सांगण्यावरुन हे आकडे घेत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून 1 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिस कर्मचारी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








