यावल ;– तालुक्यातील चुंचाळे येथील एका 20 वर्षीय नवविवाहित गर्भवती तरुणिने आज दि.29 गुरुवार रोजी रात्री तिचे राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चुंचाळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चुंचाळे येथील राजश्री अमृत पाटील वय 20 ही तरुण विवाहिता 8 महिन्यांची गर्भवती असताना तिचे कुटुंबीयांसोबत आणि इतर कोणतेही संशय भांडण-तंटा नसताना आज दिनांक 30 गुरुवार रोजी रात्री तिने अचानक आपले राहते घरात फाशी घेऊन आत्महत्या केली तिचा पती घरात झोपलेला असतानाच घटना घडली. पती लघुशंकेला उठल्यानंतर घटना लक्षात आल्यावर त्याने यावल पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती दिली विवाहित गर्भवती तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात बारा वाजेपर्यंत शवविच्छेदन केले जाणार असून पुढील तपास यावल पोलिस करीत आहेत याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी गांवातील जयसिंग विष्णू या व्यक्तीने चुंचाळे फाट्याजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि आहे हा इसम सुद्धा आत्महत्या ग्रस्त तरुण गर्भवती महिलेचा नातेवाईक होता. उपस्थित केले जात असून हळ –हळ व्यक्त करण्यात येत आहे.








