साकळी ता.यावल (वार्ताहर) ;- येथील जिल्हा परिषद मराठी मुला- मुलींच्या शाळेत एमआरजीएस योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील (छोटूभाऊ) यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या संपूर्ण शाळेस संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ जि.प.सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते आज दि.२७ करण्यात आला. यावेळी कृऊबा माजी संचालक विलास नाना पाटील,ग्रा.पं.सदस्य दिनकर माळी, खतीब तडवी यांचेसह मुलांची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण तेली, मुलींची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोरसे, मुख्याध्यापक परमान तडवी, मुख्याध्यापिका सौ.मंगला सपकाळे, शिक्षण प्रेमी सदस्य नितीन फन्नाटे यांचेसह गावातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.








