जळगाव ;- शहरातील कंजारवाडा परिसरात कंटेनमेंट झोन असल्याने कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत . मात्र कंटेनमेंट झोनमध्ये लग्न समारंभासाठी मंडप उभारणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचा आदेश क्र॑ दंडप्र- 01/कावि/2020/266 दिनांक 31/05/2020 अन्वये दिनांक 01/06/2020 ते दिनांक 30/06/2020 पावेतो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातुन कोरोना विषाणु (कोव्हीड-19) च्या संसर्ग होऊ नये या करीता संपुर्ण जळगाव जिल्हयात फौजदारी प्रकीथा संहीता 1973 चे कलम 144 प्रमाणे कोरोना विषाणुचा प्रसार होवु नये याकरीता घेण्यात येणा-या सभा, मेळावे,
सामाजीक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरुस, धामीक व जातीय कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, आठवडे बाजार, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन करणे बंदी अरालेचे तसेच कंटेनमेंट झोन म्हणुन घोषीत करण्यात आलेल्या ठिकाणी सक्तीने नियंत्रण रहावे याफरीता कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना बाहेर जाता येणार नाही तसेच बाहेरील व्यक्तीला आत जाता येणार नाही. तसेच सर्व प्रकारच्या कार्यक्रगांस बंदी असले बाबतचे आदेश दिनांक 01/06/2020 चे रात्री 00:01 वा. पासुन लागु करण्यात आले आहे. १४ रोजी कंटेनमेंट झोम कंजरवाडा, पायघन हॉस्पीटल समोर, जळगाव येथे पो.कॉ. 2161 हेमंत
पाटील यांची सकाळी 08:00 वा. ते 20:00 बा. पावेतो डयुटी होती. त्यांचे सोबत जी.एस.टी. विभागाचे एरा.टी.आय. श्री. संदीप
देवराम पाटील तसेच महानगरपालीकेचे शिपाई डिगंबर मुकुंदा खाचने असे डयुटीस होते. तेव्हा त्यांनी मा पोलीस निरीक्षक श्री.
विनायक लोकरे सो. यांना फोन द्वारे कळविले की, कंजरवाडा, पायघन हॉस्पीटल समोर, जळगाव कंटेनमेंट झोन येथे डयुटीस
असतांना सदर कंटेनमेंट झोन मध्ये मला गंडप लावलेला दिसत आहे. पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या आदेशाने
स.फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विश्यास बोररो, पोकॉ. सविन पाटील हंसांचे पथक रवाना केले असता तेथे कंटेनमेंट झोन मध्ये रहाणारे संजय सावन बाटुंगे व सौ. दिपमाला सजय बाटुंगे यांची मुलगी साक्षी संजय बाटुंगे हीचे आज रोजी स्वामी सर्मथ मंदीर येथे लग्न असुन लग्नासाठी त्यांनी कंटेनमेंट झोन
मध्ये रहाणारा गणेश नंदु बागडे याचे कडुन मंडप लावल्याबाबतची माहीती मिळाली होती. त्यांनतर मंडप काढण्यात आला .
आज सकाळी शहरातील जाखनी नगर कंजरवाडा, पायघन हॉस्पीटल समोर, जळगाव येथे कंटेनमेंट झोन मध्ये कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नसतांना संजय सावन बाटुंगे ब सौ. दिपगाला संजय बाटुंगे यांनी त्यांची मुलगी साक्षी संजय बाटुंगे हीचे लग्नाच्या निमीताने गणेश नंदु बागडे या टेन्ट हाऊस
वाल्याकडुन मंडप लावुन जिल्हाधीकारी यांनी वर नमुद केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन त्यांच्या अशा वागण्यामुळे कोरोना सारखा साथीच्या रोगाचा प्रसार होवु शकतो हे त्यांना माहीती अरातांना सुध्दा त्यांनी असे कृत्य केले म्हणुन त्यांच्या विरुद्ध ललीत केशव गवळे यांच्या फिर्यादीवरून
विरुध्द भादंवि कलम 188, 269 प्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .