जळगाव ;- जिल्ह्यातील खासगी प्रयोगशाळांच्या तपासणी अहवाल आज सकाळी प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा नव्याने १८ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत . यात जिल्ह्यातील भडगाव ५, रावेर ७, भुसावळ ५ आणि अमळनेर १ अशा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे . जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून ७५ पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर २५० च्यावर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे .