पहूर – येथे कृषी पंडित मोहनलाल लोढा यांची पुण्यतिथी साजरी यानिमित्त #दिव्यांग बांधवांना तसेच निराधार कुटुंबीयांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली .
जामनेर तालुक्यातील पहूर येथील स्वर्गीय सहकार महर्षी तसेच कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या आज पुण्यतिथीनिमित्त येथील कृषी पंडित मोहनलाल लोढा तसेच जामनेर येथील दिव्यांग नवी दिशा बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे दिव्यांग तसेच निराधार कुटुंबीयांना रोख स्वरुपात आर्थिक मदत करण्यात आली.
आज सकाळी दहा वाजता कृषी पंडित मोहनलाल लोढा ग्रामीण पतसंस्थेत संस्थेचे संस्थापक स्वर्गीय कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . यानिमित्त पहुर पाळधी परिसरातील सर्व गावातील दिव्यांग व निराधार कुटुंबियांना रोख रक्कम देऊन आर्थिक मदत देण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव पांढरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद कृषी माजी सभापती प्रदीप लोढा ,जामनेर येथील दिव्यांग नवी दिशा बहुउद्देशीय संस्था जामनेर अध्यक्ष रवींद्र झाल्टे ,ग्रामपंचायतचे उपसरपंच श्याम सावळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, शिवसेना विभाग प्रमुख तथा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे ,संस्थेचे संचालक प्रताप परदेशी ,वाकोद गावचे माजी सरपंच तेजमल जैन ,आशिष माळी ,शाकीर शेख ,महेंद्र बनकर आदी मान्यवर उपस्थित होते . या सर्वांच्या हस्ते दिव्यांग निराधार कुटुंबीयांना आर्थिक मदत कोराना महामारी मुळे गरीब निराधार कुटुंबियांना आपली आर्थिक मिळावी या उद्देशाने या सर्व कुटुंबियांना कृषी पंडित मोहनलाल लोढा ग्रामीण पतसंस्था तसेच जामनेर येथील दिव्यांग नवी दिशा बहुउद्देशीय संस्था संयुक्त विद्यमाने आज स्वर्गीय कृषी पंडित मोहनलाल लोंढा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कार्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे मॅनेजर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी प्रमोद पाटील अशोक देठे शिपाई पंकज धूळ संधिर यांच्यासह गावातील नागरिक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.