जळगाव ;- आपल्या गावी पायी जाणाऱ्या महिला आणि मुलींना हेरणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा पोलीस शोध घेत असून त्याची माहिती देणार्यास पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे . याबाबत माहिती अशी कि
नशिराबाद पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव गु.र.नं.१४७/२०२० भा द वी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला
आरोपी गणेश सखाराम बांगर,बय ३२ वष्रा मुपो .पो. मालेगाव, वार्ड नं. ४, पंचायत समिती जवळ,ता. मालेगाव,जिल्हा-बाशीम हा पाहीजे असलेला आरोपी असुन त्यास अटक करणे आहे. आरोपीचे उजव्या हाताच्या अंगठ्यावर ”माँ ”व पंजावर ” आई ”असे हिंदी व मराठीत गोंदलेले आहे.
गुन्हा करण्याची पध्दत
सध्याच्या काळात लॉकडऊन सुरु असुन मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात स्थंलातर चालू आहे याचा फायदा घेऊन
गावी पोहोचाविण्यास मदत करतो असे सांगुन स्त्रीया व मुलींना हेरून मोटार सायकलवर बसवुन पळवुन घेवुन जातो. हॉटेल, धाबा चालविण्यास घेतो व नोकरी लावुन देतो असे आमीष दाखवुन फसवणुक करतो.
सध्या आरोपीकडे असलेली मोटार सायकल ही चोरीची असुन कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन जि. वाशिम २०१/२० २० भादबी कलम ३७९ प्रमाणे दाखल आहे,
आरोपी बाबत माहिती खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा
योग्य ते बक्षीस दिले जाईल
संपर्कः- १) उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग – ५४०४८०७२०७
२) वरिष्ठ पोलीस निरीक्षक , स्थागुशा जळगाव – ९८२३०१९७११
३) सहाय्यक पोलीस निरीक्षक , नशिराबाद – ९६८९९०३५८८