जिल्ह्यात आतापर्यंत ३२० कोरोना बाधित रूग्ण
जळगाव;- जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 45 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे अकरा, चोपडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 320 इतकी झाली आहे.