जळगाव ;- जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीतून मोटरसायकलची चोरी झाली होती . एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार शिरसोली गावातून दोन आरोपीना चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले . मनोज यशवंत जाधव वय २६ रा. प्रजपात नगर आणि सागर महार सपकाळे वय ३२ रा. शनिपेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच टीइ -७०१३ जप्त केली आहे. हि कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड निलेश भावसार प्रकाश पवार राजेंद्र ठाकरे यांनी केली आहे . जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे