जळगाव ; – सध्या कोरोनामुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन ची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा गंभीर परिस्थितीत जळगांव शहरातील ५००० ते ७००० गोर गरीब असलेले केशरी कार्ड धारकांना तांत्रिक कारणामुळे रेशन दुकानातून स्वस्त धान्य मिळत नाही आहे. तरी त्यांना त्वरीत धान्यासाठी शिक्के मारून मिळावे. जेणेकरून या केशरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळेल व त्यांची उपासमार होणार नाही.अशी मागणी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अमजद पठान यांनी केली आहे.