जळगाव (प्रतिनिधी)- तुकारामवाडीत जुन्या वादातून आपसात झोंबाझोंबा करणार्या भूषण विजय माळी (19), दत्तू उर्फ गोलु नारायण चौधरी (27), आकाश रवींद्र मराठे व एक अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. शनिवारी सायंकाळी सात वाजता हा वाद झाला.
या तिघांजवळून सुरा, लोखंडी आसारी व लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला आहे. या चौघांनी जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन केले. त्यांच्याविरुध्द कलम 160 व आर्मअॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी गोविंदा विश्राम पाटील यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील व असीम तडवी यांनी घटनास्थळावर धाव घेऊन वाद सोडविला व चौघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला समज देवून सोडून देण्यात आले आहे.