40 गरीब गरजूना किराणामालासह अत्यावशक मदत
पारोळा /होळनांथे ता.शिरपूर ;- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात सगळी कडे महिनाभरा पासून लॉक डाउन सुरु आहे. या काळात सर्व गोरगरिबांना गावात काम नाही आणि घरात अन्नचा एक कण नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.अश्या गोरगरिबांच्या मदतीला अनेक दानशूर पुढे येत आहेत .
आणि याच पार्श्वभूमी वर
वीस वर्षापूर्वीचा वर्ग मित्रांचा ग्रुपने सोशल मीडिया चा आधार घेत व एकमेकांच्या संपर्कात येत गरजू लोकांच्या मदतीसाठी मदत निधी जमा केला .
आर. आर. खंडेलवाल होळनाथे विद्यालयाच्या २००१ मध्ये १० वीत शिकणाऱ्या मुलामुलींनी आपल्या गावात आपल्या शिक्षकांच्या नावाने अन्नदान योजना सुरु केली आहे. लॉक डाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या गरीब , गरजू व निराधार लोकांना शोधून या योजनेंतर्गत अत्यावश्यक किराणा सामान घेऊन देण्यात आला . ज्याला या योजनेचा लाभ द्यायचा आहे अशा गरजू कुटुंबाला शोधून मदत केली गेली त्यांच्याकडून आवश्यक सामानाची यादी घेतली व त्यानुसार त्यांना किरणा घेऊन देण्यात आला . अस्या ४० कुटुंबांना खंडेलवाल विद्यालय २००१ मित्र परिवाराच्या
वतीने किराणा घेऊन देण्यात आला .
यापूर्वीही या विद्यार्थ्यांनी गुरुंप्रती कृतज्ञता दाखवत स्व. अरुण कुळकर्णी विद्यार्थी सन्मान योजना राबविली आहे. मागील वर्षी या योजने अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते.योजनेसाठी प्रदीप पवार, अनिल कुंभार, किशोर राजपूत , जयेश सोनगिरे, संदेश सोनवणे जावेद मौले ,मोतीलाल कोळी ,मनोज पाटील अशोक शिंदे ,लक्ष्मण बंजारा . गणेश पाटील , संदीप पाटील, दिलीप भोई तसेच वर्तमान पत्र केसरीराज पारोळा चे प्रतिनिधी जितेंद्र वानखेडे यांनी परिश्रम *घेतले .
वीस वर्षापूर्वीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत जे माणुसकीचे दर्शन घडविले त्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.