रावेर ;- रावेर विधानसभा मतदार संघात कोरोना विषाणूची बाधा कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना होऊ नये म्हणून आणि मतदार संघात कोरोना विषाणू संदर्भात कोणालाही बाधा होऊ नये म्हणून जनजागृती व्हावी या उद्देशाने आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विशेष दक्षता घेऊन यावल तहसील कार्यालयात यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांना व महसूल कर्मचाऱ्यांना, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोलीस कर्मचाऱ्यांना,तसेच मुख्याधिकारी बबन तडवी व नगरपालिका कर्मचारी,पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी निलेश पाटील, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बर्हाटे, डॉक्टर फिरोज तडवी,फैजपूर नगर परिषद मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना चांगल्या प्रतीचे माक्स वाटप करण्यात आले.







