थायलंडहून आलेल्या विद्यार्थ्याला केले उपचारासाठी दाखल
जळगाव ;- बाहरेगावहून आणि परदेशातून आलेल्या सुमारे ६० हुन अधिक व्यक्तींवर आज जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले असून एक संशयी म्हणून थायलंडच्या विद्यार्थ्याला वार्ड क्रमांक १३ मध्ये दुपारी ४ वाजता ऍडमिट करण्यात आले असून त्याचा तपासणी रिपोर्ट पुणे येथे पाठविण्यात आला आहे . आज करण्यात आलेले संशयित हे पुणे ,मुंबई,नंदुरबार, जबलपूर, कल्याण ,नाशिक आदी जिल्ह्यातून आलेल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत २३रुग्ण संशयित आढळले होते यापैकी १७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यातील २ जणांचे रोपोर्ट रिजेक्क्ट झाले आहेत . तसेच चौघांच्या तपासणीचा अहवाल येण्याचा बाकी आहे अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली .