चाळीसगाव ;- राज्यावर कोरोना संसर्गामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत समाजमनाचा म्हटल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील चाळीसगाव तालुक्यातील बांधवांची बैठक आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलावली होती.
पत्रकारिता करत असताना पत्रकारांना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्या अडीअडचणी माध्यमातून मांडाव्या लागतात मात्र हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे देखील गरजेचे असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांना भेट म्हणून सॅनिटायझर, हँडवाश भेट म्हणून दिले व तालुका विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा केली.
सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर लक्ष ठेवून वेळीच त्याला आवर घालण्याची जबाबदारी पत्रकारांनी पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले.