मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी सहजोगत्या केले होते. ‘सौदागर’, ‘डिस्को डान्सर’ अशा हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विष्णूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. पण अखेर त्यांची ही कोरोनाशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली आणि कोरोनाने त्यांचा वयाच्या ९२ व्या वर्षी बळी घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
मारुतीराव काळे हे बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध कला दिग्दर्शकांपैकी एक नाव जरूर आहे. मात्र ते मूळ मराठी होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील १०० हून अधिक चित्रपटांचे अव्वल व लक्षात राहतील असे सेट तयार केले होते. १९६० साली आलेल्या आणि अत्यंत गाजलेल्या ‘मुघल-ए-आजम’ या चित्रपटासाठी देखील त्यांनी काम केले होते. मारुतीराव काळे यांची मुलगी कल्पना काळे यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.