पारोळा (प्रतिनिधी) – येथे भीम आर्मीतर्फे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आज रोजी साजरा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरपालिकेचे लोकप्रिय व्यक्तिमत्व उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान यांच्य हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. आज संपूर्ण विश्वाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असून बुद्धांचे विचार आत्मसात केल्यास जगात शांतता नांदेल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमात भीम आर्मी चे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे, महासचिव प्रताप पाटील, सरचिटणीस भाऊसाहेब सोनवणे, अनिल सोनवणे , अनिल पाटील, मयूर पाटील ,कुणाल गायकवाड उपस्थित होते.