जळगाव ;- गेल्या अनेक वर्षापासून रहिवासी भागातील सांडपाण्यामुळे मेहरूण तलावात जलप्रदूषण वाढले आहे. एकमेव पर्यटनस्थळाचे वैभव राखण्यासाठी तलावात जाणारे सांडपाणी नाल्यात वळवण्यात येणार अाहे. यासाठी २ काेटी रूपयांची तरतूद करण्याचे आदेश महापाैर जयश्री महाजन यांनी दिले.
परिसराचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने ते मेहरुण तलावात शिरते. त्यामुळे तलावात जलप्रदूषण वाढले अाहे. या पार्श्वभूमीवर महापाैर जयश्री महाजन व उपमहापाैर कुलभूषण पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. त्यांनी सांडपाणी नाल्यात वळवण्यासाठी दाेन काेटींची तरतूद करण्याचे अादेश बांधकाम विभागाला दिले. भारती प्रतिष्ठानच्या सुजाता देशपांडे, आनंद मल्हारा, शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले उपस्थित होते.








