जळगाव (प्रतिनिधी ) ;- अमळनेर येथील आर.आर. ट्रेडर्स आणि अंबे स्टील ट्रेडर्सतर्फे गरजूना किराणा किट साहित्याचे वाटप आज करण्यात आले. संचालक हिराराम परेमाराम देवासी ,रोहन वाडिले यांनी सांगितले कि , कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच अनेकांना रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे १५ कुटुंबाना अंबे स्टील ट्रेडर्सतर्फे किराणा साहित्याचे आज सोमवार १७ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते.