शिरसाेली ;- जळगाव तालुक्यातील शिरसोलीत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जावून अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीतर्फे घेण्यात अाला. या मोहिमेची सुरुवात बुधवारी सरपंच प्रदीप पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात ११३ नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यापैकी १० नागरिकांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. या मोहिमेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्विनी देशमुख, डॉ. करूणा भालेराव, नायब तहसीलदार दिलीप बारी, आरोग्यसेवक नीलेश चौधरी, अनिल महाजन व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.








