अमळनेर ( प्रतिनिधी ) ;-अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ डिसेंबर २०२० पासून बेपत्ता झाली होती अमळनेर पोलीस स्टेशन भाग – ५ गु.र.न. ६९०/२०२० भा द वि . ३६३ गुन्हा दाखल करण्यात आला होता .
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ .प्रविण मुंढे यांनी अमळनेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना व मार्गदर्शन केले होते . त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे एएसआय – विजय पाटील , हेकॉ नरेन्द्र वारुळे , संदीप साळवे तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पीएसआय गंभीर शिन्दे , हेकॉ कैलास शिन्दे ,योगेश महाजन यांचे पथक तयार केले होते .
सदर पथकाने वरिष्ठाचे सुचानां प्रमाणे फिर्यादी यांचे नातेवाईक यांचे कडेस मंगरूळ , धुळे , नंदूरबार , उधणा ( गुजरात ) , साईखेडी ( मध्यप्रदेश ) या ठिकाणी शोध घेतला . ३१ मे रोजी सदरची बेपत्ता १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हि साईखेडी ( मध्यप्रदेश ) येथे तिचे नातेवाईकांकडे मिळून आल्याने तिला तिच्या पालकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे .