चुंचाळे ता. यावल :- तालुक्यात व जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने लस उपलब्ध होत असल्याने पुन्हा ४५ वर्षावरील कोरोणा लसीकरणास गती मिळताना दिसत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे व साकळी ग्रामीण चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील, प्रा. आ. केंद्र साकळी यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे येथे कोरोना लसीकरणास आज१२ रोजी प्रारंभ करण्यात आला. ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक कोवीशील्ड लसीचे डोस देण्यात आले. स्पॅाट रजिस्ट्रेशन आरोग्य सेविका मालती चौधरी यांनी केले.
लसीकरण शुभारंभ उपसरपंच नजिमा तडवी,यांच्या हस्ते झाले यावेळी सदस्य सुकलाल राजपुत, सुधिर चौधरी,रहिमान तडवी,संजय तडवी,ग्राम रोजगार सेवक दिपक कोळी,संगणक परिचालक सुधाकर कोळी,ग्रा.प.शिपाई मनिष पाटीलआदी उपस्थित होते.
यावेळी लसीकरणाचा दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.एकुण १२६ लाभार्थ्यांनी कोवीडशिल्ड ची लस घेतली
लसीकरण झाल्यावर आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल सोबत लिंक असेल त्या लिंक वरून आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून ते जतन करून ठेवावे. असे आरोग्य सेवक सदिप शिदे यांनी सांगितले तर लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी नियमित मास वापरावा. व सामाजिक अंतर ठेवावे असे आव्हान सामुदायिक आरोग्य अधिकारी अमोल अहीरे यांनी केले.
शिबिरास आशा स्वयम सेविका जयश्री चौधरी,सलीमा तडवी, बोराळे आशा वर्कर सुनैना राजपुत, आरोग्य सेवीका मदतनिस कवीता कोळी व ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.