तरुणाची हत्या करून मृतदेह जाळण्याचा झाला प्रयत्न
अमळनेर : अमळनेर (प्रतिनिधी ) ;- : शहरापासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळासदडे वनविभागातील शिवारात अर्धवट जळालेला पुरुष जातीचा ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याने त्याचा खून करून ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून मृतदेहाला जाळून टाकण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे . दरम्यान हा घातपाताचा प्रकार असल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते . मृतदेह आढळून आल्याने कुणी बेपात्ता असल्यास त्यांनी ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.