जळगाव – शहरातील हरिविठ्ठल नगर येथे १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजता समोर आली. रितेश गुलाबराव मोरे (वय १७, रा. मराठी शाळेजवळ, हरीविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








