जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील उन्हाळी सत्रातील माहे मे, जून, जुलै २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अर्ज विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन भरण्यात येत आहे. सदर परीक्षा अर्ज भरतांना विद्यार्थ्यांनी परीक्षा फी संदर्भात अनुसरायची कार्यपध्दती कळविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज शक्यतो डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा नेट बँकींगचा वापर करून भरावा. यु.पी.आय. द्वारा भरणा टाळावा असे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अकांऊट मधून फी डेबीट झाली असेल परंतू परीक्षा अर्ज भरला गेला नसेल तर विद्यार्थ्यांनी पुन्हा फी भरण्याची आवश्यकता नाही. ३-४ दिवसात बँक जुळवणीनंतर ऑटो सबमीट होऊन अर्ज भरला जाईल. तरी विद्यार्थ्यांनी पुन्हा फी भरण्याची घाई करू नये.
परंतू तरी देखील विद्यार्थ्यांकडून पुन्हा फी भरली गेली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जादा भरलेली फी परत मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, पीआरएन नंबर, ट्रँझेक्शन आय. डी., बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, भरलेली रक्कम इ. माहिती सह refunds@nmu.ac.in या ईमेल आयडीवर मेल करावा व बँक स्टेटमेंट ची स्कॅन कॉपी, एसएमएसचा स्क्रीन शॉट ईमेल सोबत जोडावा त्यामुळे पुढील कार्यवाही करता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली आहे.