पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठकीला सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.
पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत. दुपारी मुख्यमंत्री विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले.