जळगाव : शहरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पत्र क्रमांक ४१९५ दि २१ जुलै अनुसार जळगाव शहरातील सहा खाजगी रुग्णालय यांना कोविड १९चे दवाखाने चालवण्याची परवानगी प्रशासना तर्फे देण्यात आली असून आता त्यांना कोविड पॉझिटिव्ह पेशंट आपल्या दवाखान्यात भरती करता येईल व त्यावर उपचार करता येईल ही बाब जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची असून यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल.

जळगाव शहरात पूर्वीपासून गोल्ड सिटी हे एकमेव खाजगी रुग्णालय कोविड चे रुग्ण भरती करून उपचार करीत होते. २१ जुलै च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी मनपा जळगाव यांना दिलेल्या आदेशानुसार
१) डॉ.राहुल महाजन ( चिन्मय हॉस्पिटल )
२) डॉ.वींद्र पाटील ( द्वारका हॉस्पिटल )
३) डॉ.पल्लवी केतन राणे ( रुबी हॉस्पिटल )
४) डॉ.परीक्षित बाविस्कर ( आरूश्री हॉस्पिटल )
५) डॉ.धनराज चौधरी (लोकसेवा हॉस्पिटल )
६) डॉक्टर पंकज राणे (ओम क्रिटिकल अँड ट्रॉमा सेंटर )
अशा सहा दवाखान्यांना कोविड पेशंट उपचार करण्याची परवानगी दिलेली आहे.
शासन आदेशानुसार फी आकारणी करा
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने २१ मे २०२० रोजी आदेश क्रमांक कोरोना-२०२०/ सी आर ९७/ एआरओ-५ मधील परिशिष्ट सी प्रमाणे फी आकारणीचा मसुदा दिला असून त्या व्यतिरिक्त अथवा जास्त फी आकारू नये अशी रास्त मागणी जळगाव कोविड केअर युनिटने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने या सर्व व खाजगी हॉस्पिटल ला २३जुलै रोजी ई-मेल द्वारे केलेली आहे.







