नवी दिल्ली ;- सर्पदंशामुळे भारतात गेल्या 20 वर्षांमध्ये जवळपास 12 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
मृत्यू झालेल्यांचं वय 30 ते 60 दरम्यान होतं. यात एक चतुर्थांश मृत्यू मुलांचे झाले आहेत.
सर्पदंशामुळे अनेकांचा जीव जातो, कारण याप्रकारच्या घटना बहुतेक करून अशा भागात घडतात, जिथपर्यंत वैद्यकीय मदत पुरवणं दुरापास्त असतं.
मान्सूनचा कासर्पदंशाची जवळपास अर्धी प्रकरणं जून ते सप्टेंबरदरम्यान म्हणजेच मान्सूनच्या काळात घडतात. या काळात साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात, असं म्हटलं जातं.बहुतेक घटनांमध्ये साप व्यक्तीच्या पायाचा चावा घेतो.सायन्स जर्नलच्या ई-लाईफमध्ये प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध, भारत आणि जगभरातील अनेक वैज्ञानिकांनी एकत्र येऊन तयार केला आहे.