आरोपी पती जखमी झाल्याने धुळे रुग्णालयात
चाळीसगाव;- पत्नी नांदावयास येत नाही म्हणून पतीने तिचे माहेर गाठत तिचा खून केला. ही घटना चाळीसगाव शहरापासून तीन कि.मी. अंतरावर असणा-या करगाव तांडा क्रमांक चारमध्ये मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता घडली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पतीशी बेबनावामुळे मयत कविता युवराज जाधव (वय ४५) ही विवाहिता करगाव तांडा क्रमांक चारमध्ये तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती . पिंपरखेड (ता.चाळीसगाव) येथील तिचा पती युवराज कपूरचंद जाधव याने मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास करगाव येथे येऊन धारदार सुऱ्याने झोपेतच तिचा खून केला. विवाहिता त्याच्यासोबात पिंपरखेड येथे नांदावयास जात नव्हती. असे कारण सांगितले जात आहे.पत्नीवर हल्ला केल्यानंतर आरोपी युवराज जाधवने स्वतःच्या पायाचे हाड फ्रॅक्चर होईपर्यंत स्वतःच मारून घेतल्याने पोलिसांनी त्याला धुळ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले . या दाम्पत्याला अनुक्रमे २५ व २२ वर्षांच्या २ मुली आणि १८ वर्षांचा १ मुलगा आहे . तपास पीएसआय अभिजीत पांडे हे करीत आहे.