यावल ;- नायगाव येथिल सातपुडा माध्यमिक विद्यालय येथील उपशिक्षक विकास भिमराव सुर्यवंशी यांची कोरोना विषाणू ( कोविड -१९ ) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशान्वये अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. देशावर आलेल्या भयंकर महामारीत कोरोना विषाणू बाबत जनजागृती करत आहेत. मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही प्रामाणिकपणे स्वयंसेवक म्हणून कर्तव्य बजावले.
देशासाठी देशभक्ती ही भावना मनात ठेऊन वर्गात शिकवणारे हे शिक्षक आज लोकांना कोरोनाची लागण होणार नाही यासाठी रेशन दुकानावर जनजागृती करत आहेत.तसेच याआधी त्यांनी कोळव्हावी नाक्यावर सुद्धा रात्रीच्या प्रसंगी आपले कर्तव्य बजावले.याबाबत कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून सुर्यवंशी सर यांचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या.जळगाव संस्थेचे व्हा,चेअरमन विरेंद्र भोईटे ,
मानदसचिव,निलेशजी भोईटे यांनी कौतूक केले.
तसेच नायगाव गावाचे सरपंच व कोरोना समिती अध्यक्ष एल व्ही पाटील,स्थानिक स्कूल कमेटी डी.एस.पाटील ,मुख्याध्यापक,आर.बी.सोनवणे यांनी अभिनंदन पर कौतुक केले.विद्यालयातील जेष्ठ शिक्षकबंधूंनीही कौतूक केले.








