अमळनेर ;- आज तहसिल कार्यालय अमळनेर येथे तहसिलदार अमळनेर यांचे दालनात आ. अनिल भाईदास पाटील व तहसिलदार अमळनेर यांचे उपस्थितीत राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना धनादेश वाटप, आरसेनिक अल्बम -30 सीएच होमियोपेथिच्या गोळया वाटप कार्यक्रम घेण्यात आला. मा. आमदार दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील एकुण 12 विधवा स्त्रियांना प्रत्येकी रु. 20000/- वीस हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास मा. तहसिलदार सो अमळनेर मिलिंदकुमार वाघ , नायब तहसिलदार संजय गांधी योजना अमळनेर योगेश पवार, इंदिरा गांधी योजना अव्वल कारकून संगीता घोंगडे व लिपीक संजय ब्राम्हणे उपस्थित
होते. पती मयत झालेनंतर कुटूंबाचे छत्र हरविलेनंतर अर्थसहाय्य म्हणून खालील विधवांना सदर योजने अंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. अमळनेर येथील श्रीमती शालुबाई गोविंदा वानखेडे, भुराबाई अशोक साळुंखे, साधना चंद्रकांत गिते, लताबाई अर्जून धनगर, सुरेखा नाना शेटे, प्रमिला अशोक चोंधरी, जुनोने -तुळसाबाई साहेबराव महाले, जानवे- मनिषा बापू पारधी, बोरगांव- शांताबाई जंगलु भिल, मायाबाई मंगा भिल, पळासदळ- मंगलबाई सुक्राम भिल व पिंपळे बु. येथील आशाबाई अनिल म्हस्के अशा त्या पात्र लाभार्थी स्त्रियांना योजनेचा लाभ देण्यात आला.
2) संजय गांधी निराधार योजनेची बैठक दिनांक 5/5/2020 रोजी घेण्यात आली असून त्या
अंतर्गत एकूण 147 प्रकरणे, श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकुण 387 प्रकरणे, इंदिरा गांधी
राष्ट्रीय वृध्दपकाळ, विधवा व अपंग योजने अंतर्गत एकुण 91 प्रकरणे मंजुर करण्यात
आले आहे.
3) कोविड-19 च्या आजाराच्या बचावाकामी आरसेनिक अल्बम -30 सीएच गोळयांच्या डब्या
कन्टेंनमेंट झान, म.उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय, एस.टी.महामंडळ,
आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी,आशा
वर्कर्स, भाजीपाला विक्रेते ,दुध विक्रेते, शिक्षक, पोसिल पाटील, सरपंच,शासकीय धान्य
गोडाऊन कर्मचारी व हमाल,पंचायत समिती, पोलिस स्टेशन, स्वस्त धान्य दुकानदार
अशा अमळनेर येथील एकुण 4697 आरसेनिक अल्बम -30 सीएच गोळयांच्या डब्या
वाटप करण्यात आल्या.
4) अमळनेर येथे अडकलेल्या छत्तीसगड येथील 57 मजुरांना बसव्दारे छत्तीसगड
सिमेपर्यंत येथे रवाना करण्यात आले.