जळगाव;-येथील शिवकॉलनी जवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर कंटेनरचालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराची जोरात धडक बसल्याने या अपघातात अज्ञात तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून रामानंद नगर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे .
याबाबत माहिती अशी की, गॅस कंन्टेनर जळगाव शहरातून पाळधीकडे जात असतांना कंन्टेनरच्या मागे दुचाकी क्रमांक (एमएच १९ यु ५१३० ) जात होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई-रेल्वे रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना गॅस कन्टेनरने जोरदार ब्रेक मारल्याने मागून येणऱ्या दुचाकी थेट गॅस कंन्टेनरला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळाहून कन्टेनरचालकाने पळ काढण्याचा प्रयत्नात असतांना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले.







