पाचोरा ;- माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पाचोरा व भडगाव तालुका यांच्यावतीने पाचोरा भडगाव तालुक्यातील २००० गरजू तसेच अन्नधान्यापासून वंचित कुटुंबांना भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या माध्यमातून घरपोच धान्य वाटप करण्याची सुरुवात जळगाव लोकसभेचे मा. खासदार उमेश पाटील व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कोरोना (कोविड-१९) या महामारी चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात ३ मे पर्यंत संचारबंदी वाढविल्याने हातावर पोट भरत असलेल्या तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना अन्नधांन्याचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेता. तसेच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून धान्य मिळत नाही हे स्थानिक स्तरावर विचारणा करून अमोलभाऊ शिंदे यांनी या सर्व समस्यांचा आढावा घेऊन अशा सर्व ग्रामीण भागातील जनतेला घरपोच धान्य पुरवण्याची निर्धार करून या उपक्रमाची सुरुवात केली असून हा उपक्रम गरजू कुटुंबांसाठी संकटकाळी संजीवनी ठरत आहे. तसेच येणाऱ्या काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून पाचोरा आणि भडगाव ह्या दोघे तालुक्यात ५००० कुटुंबांपर्यंत पोचून धान्य वाटप करण्याचा निर्धार अमोलभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला तसेच यावेळी भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, पाचोरा शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, पितांबर पाटील, शहर सरचिटणीस दीपक माने, राजेश संचेती हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.