अमळनेर ;- येथिल लॉक डाऊन मुळे गोक्षेत्र प्रतिष्ठाण संचलित भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे गोर गरीब गरजू अश्या ११ हजार लोकांसाठी सुरू असलेला अन्नदान कार्यक्रमासाठी अमळनेरच्या दानशूर,उदार मनाच्या नागरिकांनी मोठया प्रमाणात दान देण्याचे आवाहन गोक्षेत्र प्रतिष्ठाणतर्फे व विविध सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आलेले आहे.
कोरोना साथीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातमजुरी करणाऱ्या आणि रोजंदारीने जगणाऱ्या कुटुंबांची उपासमार लक्षात घेऊन गोक्षेत्र प्रतिष्ठान तर्फे सुरवातीस २००० लोकांच्या जेवण्याची सोया करण्यात आली. मात्र गरजू लोकांची संख्या वाढत जाऊन ११००० इतकी झाली शहरात १५ केंद्रांवर दोन वेळचे जेवण पोहचवले जाऊन सोशल डिस्टनसिंग पाळत अन्नदान सुरू होते.मुंबई येथिल वर्धमान संस्कार धाम च्या मदतीने सुरू असलेले काम आता मदत थांबल्याने स्थानिक दात्यांच्या मदतीवर अवलंबून आहे.यासाठी मा.आ.शिरीष चौधरी, मा.कृषिभूषण साहेबराव पाटील,कामगार नेते रामभाऊ संदांनशिव, प्रा गणेश पवार आदींनीही दातृत्व दाखविले.मात्र येणाऱ्या ३० एप्रिलपर्यंत सदर अन्नक्षेत्र सुरू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दातृत्वाची गरज आहे.लोकांनी धान्य अथवा रोख सक्कम स्वरूपात कमीतकमी व जास्तीत जास्त कितीही मदत केल्यास स्वीकारली जाईल. असे श्रीमती भानूबेन शहा गो शाळेतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. दात्यांनी गोक्षेत्र प्रतिष्ठान, अमळनेर च्या I D B I बँक खाते क्रमांक- 0519104000095026 ,
IFSC code: IBKL0000519 या खात्यात थेट आर्थिक रक्कम जमा करावी अथवा व चेतन शाह 9422280850, प्रा अशोक पवार 9422278256,चेतन सोनार 7744022419,महेंद्र पाटील 9011977772 या क्रमांकावर प्रत्यक्ष मदत देण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, गोक्षेत्र प्रतिष्ठाण चे सौ मीना शहा,राजुभाई सेठ,संदिप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, डी ए धनगर, दिलीप डेरे,विक्रम पाटिल,सतिष वाणी आदिंसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.