अमळनेर ;- येथील वावडे गावातील पोलीस पाटील यांनी गावातील दोन जणांना तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर का ठेवत नाही म्हणून विचारले असता त्यांनी त्यांना मारझोड करून जीवे मारण्याची धमकी दिली.
सविस्तर वृतांत असे की, वावडे गावचे पोलीस पाटील दत्तात्रय ठाकरे हे शासकीय काम करत असतांना गावातील अनिल पाटील व प्रभाकर पाटील हेयांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे लक्षात आल्याने
पोलीस पाटील दत्तात्रय पाटील यांनी हटकले असता त्या दोघांनी अश्लील हावभाव करीत लाथाबुक्यांनी मारझोड करीत जीवे मारण्याची धमकी देत जवळजवळ ८४०० रुपये चे नुकसान केले.
याबाबत पोलीस पाटील दत्तात्रय पाटील या दोघांच्या विरोधात फिर्याद दिल्याने त्यांच्या विरोधात भाग 5 गुरनं 20/2020 भादवी कलम 353, 294, 323, 504, 506,427, 188 व 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सपोनि राहुल फुला करीत आहे.