जळगाव ;-येथील तहसील कार्यालयात व्हेंडरचे काम करणाऱ्या ४२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अयोध्या नगरातील दिपक लक्ष्मण पाटील (वय-४२) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, चंद्रकांत लक्ष्मण पाटील रा. अयोध्या नगर येथे आपला मोठ्या भाऊ दिपक लक्ष्मण पाटील (वय-४२) कुटुंबासह दुमजली इमारतीत राहतात. दिपक पाटील यांच्या सासुचे कन्सरचे ऑपरेशन झाले होते. त्यांना पाहण्यासाठी दिपक यांची पत्नी व दोन मुले माहेरी शहापूर ता. जामनेर येथे १७ एप्रिल रोजी गेल्या. त्यावेळी दिपक पाटील हे तळमजल्याच्या घरात एकटेच होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास दिपक एकटा घरात असल्याने त्याला चहा देण्यासाठी लहान भाऊ चंद्रकांत पाटील हे चहा देण्यासाठी गेले असता दरवाजा आतून बंद होता. आवाज दिल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने त्यांनी दरवाजा आतून उघडला. आत गेल्यावर भाऊ दिपक पाटील यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. दरम्यान गळफास घेतल्यानंतर दोरी तुटल्याने ते खाली पडलेले होते. त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणण्यात आला. चंद्रकांत पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.