जळगाव :- महावितरणचे दिवंगत तंत्रज्ञ गजानन राणे यांच्या कुटुंबियांची मंगळवारी (८ जून) महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी महावितरणच्या जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरमचे परिमंडल सचिव विजय सोनवणे उपस्थित होते. राणे यांच्या वारसांना महावितरणकडून कंपनी नियमानुसार सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दिले.