फैजपूर ;- अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प.बंगालचे निकाला नतंर ममता दिदीनी प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या व गौरवाने झाशीच्या राणीची उपमा दिली . त्याबद्दल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चद्रकांत पाटील यांनी भुजबळ साहेबांना धमकी दिली व भुजबळ तुम्ही जामीनावर आहात यासह अनेक बेताल वत्कव्य करुन दादागिरीच्या भाषेत धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटनेते शेख कुर्बान, शहराध्यक्ष हाजी करीम, नगरसेवक अनवर खाटीक,रशिद तडवी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकीर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अशोक भालेराव ,युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे ,अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद शेख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.