जळगाव;- कोविड १९ चा संसर्ग तात्काळ ओळखण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट महत्वाची ठरत आहे. मात्र रिपोर्ट येण्यास उशिर होत असल्याने नागरिकांना तात्कळत राहावे लागत होते, पण एनएबीएल मानांकित आरटीपीसीआर लॅबमधून अवघ्या २४ तासातच रिपोर्ट मिळत आहे, या डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर सेंटरचा फायदा जिल्हावासियांना होत आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लॅबच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने स्वॅब कलेक्शन केले जात आहे. येथे २५ ते ३० तंत्रज्ञ येथे २४ तास सेवा देत आहे. दर दिवसाला येणारे सॅम्पल तपासणी प्रक्रियेत लावले जातात, स्वॅब लॅबमध्ये आल्यावर २४ तासातच रिपोर्ट देण्यात येत आहे. परिणामी रिपोर्ट पॉझिटीव्ह असला तर तातडीने उपचार करणे सोयीचे होत आहे. याकरीता जळगाव, भुसावळ, चोपडा आदि ठिकाणी स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात आले आहे, या स्वॅब सेंटर्समधून डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर लॅबमध्ये सॅम्पल येवून ते तात्काळ तपासले जात आहे.
दर दिवसाला ३५० ते ४०० सॅम्पल तपासले जावून रिपोर्ट सदर लॅबला वा व्यक्तींना पाठविले जात आहे, मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती ओळखून जास्तीत जास्त स्वॅब तपासले जावे यासाठी अत्याधुनिक मशिनरींची ऑर्डर देण्यात आली असून लवकरच ती मशिनरी लॅबमध्ये दाखल होईल. तरी जिल्हावासियांनी जळगाव शहरातील गोदावरी हॉस्पीटल, भास्कर मार्केट येथे ०२५७-२२२१८३४/३५ तसेच भुसावळ येथील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील लॅबसाठी ९३७०१ ८६८०२, ७२१९७१७२५६ या क्र्रमांकावर संपर्क साधत स्वॅब देवून चाचणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या एनएबीएल मानांकित लॅबध्येही प्रत्यक्षात स्वॅब देण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी ९५४५० ०९७७०, ९८८१० ६४०३ या क्रमांकावर संपर्क साधा साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








