नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रिंट मीडियासाठीच्या (मुद्रित माध्यम) सरकारच्या नवीन धोरणांमुळे डिजिटल जाहिरात खर्चाला (डिजिटल अॅडेक्स) प्रोत्साहन मिळेल आणि मुिद्रत माध्यमाचा महसूल कमी होईल. विविध मंत्रालये आणि विभागांच्या मुिद्रत माध्यमासाठी दिल्या जाणा-या जाहिरातींसाठी धोरणात्मक नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केली आहेत. यातहत ब्युरो ऑफ आऊटरीच अॅण्ड कम्युनिकेशनला स्वयंचलित प्रक्रियेतहत जाहिरात सूची खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नामांकनासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. वृत्तपत्रांसाठी सार्वजनिक उपक्रमांच्या जाहिरातींचे दरांची पुनर्रचना केली आहे. वृत्तपत्रे आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतांना या नवीन दरांमुळे वृत्तपत्रांच्या महसुलात आणखी घट होण्याची शक्यता आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे १ ऑगस्ट २०२० पासून लागू होणार आहेत.








