जळगाव;- रेल्वेस्थानकाजवळ एका १२ वर्षाच्या बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हर्षवर्धन सुदाम पवार (वय-२०) रा. गेंदालाल मील, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे.
१८ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दूध डेअरीच्या ओट्यावर बसलेली होती. बाजूला एक अनोळखी इसम हा बसलेला होता. त्याने त्या बालिकेचा विनयभंग केला. हा प्रकार छावा मराठा युवा महासंघाचे भैय्या पाटील व त्यांच्या मित्रांना दिसला. त्यांनी त्या इसमाला चोप दिला. दुसऱ्या दिवशी शनिवारी पिडित बालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी हा पाळधी ता.धरणगाव बसस्थानकाजवळून अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अक्रम शेख, सुधिर साळवे, गणेश शिरसाळे, तेजस मराठे, सचिन वाघ यांनी कारवाई करत दुपारी ३ वाजेच्या सुमारास अटक केली. संशयित आरोपी हर्षवर्धन पवार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.








