करमूडचे दिलीपआबा सोनवणे, गोदावरीचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी यांच्या समन्वयातून पत्रकार असलेल्या कोरोना रूग्णांचा जिव भांडयात
जळगाव ;- ;- हे कलीयुग आहेत जेथे सख्खा सख्यांचा वैरी होतो तेथे परक्याकडून काय अपेक्षा कराल. पण काल दि १४ जूलै रोजी करमूळच्या कोठावदे परिवाराने बाबांच्या चितेला अग्नीडाग देउन होताच दुख बाजूला सारत पत्रकार कोरोना रूग्णांस गरज असलेले रेमेडीसिवर इंजेक्शन जळगावच्या नेरीनाका स्मशानभुमीत देउन नवा आदर्श निर्माण केला आहे. करमूडचे दिलीप आबा सोनवणे व गोदावरीचे जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी यांच्या समन्वयातून सदर पत्रकाराचा जिव भांडयात पडला.
कोठावदे परिवाराचा आधारस्तंभ डॉ उल्हास पाटील रूग्णालयात कोविड सेंटरला अत्यावस्थ होते. गेल्या तिन दिवसापासून या रूग्णांसाठी दिलीप आबा सोनवणे, पिलखोडचे ग्रामपंचायत सदस्य रमाकांत पाटील, गजानन मालपूरे, आणि गोदावरीचे लेखाविभागातील रमाकांत पाटील व जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकर्णी यांनी इंजेक्शनचा तुटवडा असल्याने संपर्क साधून मुंबई येथून गजानन मालपूरेंनी उपलब्धता दाखवली पण नाशिक येथून तिथल्या नातेवाईकांनी व्यवस्था करत काल सकाळी रूग्णालयात दोन इंजेक्शन पाठवले पण दुर्देवाने या आधीच कोठावदे कुटुंबाचा आधारस्तंभ गेला होता. याच रूग्णालयात दोन दिवसापुर्वी दाखल झालेल्या एका जेष्ठ पत्रकारास देखिल काल हे इंजेक्शन लागणार असल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगताच शोधाशोध फिरफिर होणार होती. पण जनसंपर्क अधिकारी राहूल कुळकणी यांनी समयसुचकता दाखवत संपादकांना आश्वस्त करून कोठावदे परिवारातील मित्र करमूडचे दिलीप आबा यांना संपर्क साधला त्यांनी देखिल परिस्थीतीचे भान ठेवत सायंकाळी ते लोक स्मशान भुमीतून आले की देतो असे सांगीतले.कुळकर्णी यांनी सोनवणेना तातडीची गरज असल्याचे सांगीतले. सोनवणे यांनी ठीक मी बोलतो असे सांगून कोठावदे परिवारातील सदस्याला भ्रमणध्वनी वरून तातडीची गरज सांगून ते इंजेक्शन देण्याची विनंती केली. कोठावदे परिवार त्यावेळी जळगावच्या नेरीनाका स्मशानभुमीत अंतिम संस्कारात होते.अशाही परिस्थीतीत ते इंजेक्शन देत नवा आदर्श निर्माण केला आहे.सदर इंजेक्शन वेळेवर मिळाल्याने उपचार घेत असलेल्या पत्रकाराचा जिव भांडयात पडला.एवढयावर सोनवणे हे न थांबता पुढील ४ इंजेक्शनची व्यवस्था देखिल चाळीसगाव येथून करून दिली आहे.








