भुसावळ ;- शहरातील हुडको कॉलनीतील मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना घडली असून यातील आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ येथील रहिवासी असणार्या महिलेने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश उर्फ गोलू सुरेश सोनार (वय १९) याने फिर्यादीच्या मुलाला घराच्या गच्चीवर नेऊन दिनांक ११ जुलै २०२० रोजी ११:३० वाजेला अनैसर्गिक कृत्य केले. म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ३८१/२०२० भादंवि कलम ३७७, पोस्को -३ (क), ४,५ (एम) ,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१),(आर),(एस),३(२),(व्हिए) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड करीत आहेत.