चिनावल ता.रावेर;- आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात चिनावल गावातील पुन्हा एक 70 वर्षीय मृत व 65 वर्षीय मृत रुग्ण असे दोन कोरोना बाधित आढळून आले आहे.बाधित रुग्णांचा काल मृत्यू झाला होता सदरील 70 वर्षीय रुग्ण गरीबी हटाव भागातील रहिवासी व 65 वर्षीय सेंट्रल बँक परिसरातील आहे. तर याआधी सुद्धा गावात एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला होता. सदरील वृत्तास स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया झोपे डॉ. ठाकुर यांनी दुजोरा दिला आहे. सेंट्रल बँक परिसर आधिच सिल असून गरीबी हटाव परिसर सील करण्यात आला आहे.
चिनावल गावातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 झाली आहे. त्यातील 2 मयत व एक उपचार घेत आहे.







