गृहमंत्री ना. अनिल देशमुख
जळगाव ;- कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित असताना कोरोनाच्या संकटात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची विरोधकांची मागणी अयोग्य असल्याची टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावात केली .
पुढे बोलताना ना. अनिल देशमुख म्हणाले कि , विरोधकांनी सध्याच्या काळात राजकारण करू नये असा सल्ला यावेळी अनिल देशमुख यांनी दिला .जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या घरी भेट देऊन नंतर गृहमंत्री नागपूरकडे रवाना झाले . यावेळी राष्ट्र वादीचे अल्पसंख्यक अध्यक्ष गफ्फार मालिक,अध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटिल,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार अनिल पाटिल उपस्थित होते.