जळगाव : शहरातील अनुराग स्टेट बॅंक कॉलनीतील तरुणाने तो रहात असलेल्या भाड्याच्या घरात गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
या बाबत वृत्त असे की निलेश सोमनाथ हिरे (26) या तरुणाचे गेल्या फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तो अनुराग स्टेट बॅंक कॉलनीतील भाड्याच्या घरात रहात होता. आज सकाळी तो रहात असलेल्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गिरणा पंपींग रस्त्यानजीक सम्राट अशोक चौकातील रहिवासी असलेला त्याचा भाऊ मनोज सोमनाथ हिरे याने दिलेल्या खबरीनुसार रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र पाटील करत आहेत.