माजी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रशासनाला सुनावले खडे बोल
जळगाव ;- मुंबई येथून झारखंड , मध्ये प्रदेशाकडे जाणार्या परप्रांतीयांची वाहने सुमारे साडेचारशे किमी येऊन ती जळगावात अडवून त्यांना बसेसद्वारे मध्यप्रदेशाच्या सीमेपर्यंत सोडले जात आहे . मात्र असे करण्यामुळे या परप्रांतीयांच्या जीवाशी समन्व्ययाचा अभाव असल्याने खेळ सुरु असल्याचे खडेबोल माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना करून आपली नाराजी व्यक्त केली .
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले कि , मुंबई येथून परप्रांतीय हे ४ हजार भाडे ट्रकवाल्याना देऊन आपापल्या गावी जाण्यासाठी जात असताना तसेच त्यांना नाशिक , मालेगाव, धुळे येथे कुठेही अडवण्यात आले नसतांना जळगावातच का अडविले जात आहे . असा सवाल उपस्थित करून धुळे नाशिक येथे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हि कारवाई आपण करीत आहेत का ? अशी विचारणा केल्यावर त्यांनी आम्ही वाहने यादवीत नसल्याचे सांगितले . तर जळगावच्या आरटीओना विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला वरून आदेश असल्याचे सांगितले . मग वाहने अडवून या परप्रांतीयांना १०० किमी अंतरावर असलेल्या बऱ्हाणपूर येथे सोडण्यात येते . तेथून त्यांनी आपल्या गावी राज्यात कसे जायचे ? त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे . त्यामुळे एकतर त्यांना मुंबईतच का अडवून ठेवले जात नाही . मुंबई येथून निघाल्यावर त्यांना कुठल्याही जिल्ह्यात अडविले जात नाही . लहान मुले महिला आहेत त्यांनी जयचे कुठे खायला प्यायला नाही ,ऊन आहे त्यांच्या जीवाशी हा खेळ सुरु असल्याचे आ. गिरीश महाजन यांनी आपली नाराजी व्यक्त केली . कुठल्याही खात्यामध्ये समन्वय नाही नुसता सावळा गोंधळ असल्याची टीका आ. महाजन यांनी यावेळी केली .
पहा व्हिडीओ खालील लिंकवर
https://www.youtube.com/watch?v=_hbjFRAkeC8