जळगाव ;- येथील कंजारवाडा परिसरात एकावर दारू विक्रीच्या कारणावरून चौघांनी एकावर डोक्यात तलवारीचे वार करून जखमी केल्याची घटना घडली होती . यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून फरार असलेला चौथा आरोपी अक्षय आधार नेतले वय 21 वर्ष राहणार संजय गांधीनगर कंजर वाडा याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे .
फिर्यादी- सचिन सुरेंद्र अंभगे वयं:-२७,रा. कंजरवाडा याला तलवारीने हल्ला करून जखमी केले होते .
बबलु उर्फ विजय आधार नेतलेकर , प्रितेश उर्फ पिंटु आधार नेतलेकर , सुरज आधार नेतलेकर
सर्व राहणार कंजरवाडा,संजयगांधी नगर,जळगाव १६ रोजी अटक केली होती . चौथा पाहिजे असलेला आरोपी अक्षय आधार नेतले वय 21 वर्ष राहणार संजय गांधीनगर कंजर वाडा जळगाव यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे .
ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी पो.काॅ मुदस्सर काजी , पो का/2034 इम्रान सय्यद यांनी केली असुन पुढील तपास पीएसआय विशाल वाठोरे सचिन मुंडे करित आहेत.