अमळनेर ;– येथे सध्या लॉक डाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे हात मजूर,कामगार,गरीब कुटुंबांचे उदरनिर्वाह चे साधन बंद झाले आहे. हात मजुरी करणारे हात थांबले आहेत.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे.घरात अनेक सदस्य आणि उत्पन्न मिळकत काहीच नाही अश्या परिस्थितीत सर्वांनीच मदतीचे हात पुढे आले आहेत.
आपल्या कडून खारीचा वाटा म्हणून महिला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या यांनी बांधिलकी जपत आपली कन्या कु मानसी साळुंके हिचा वाढदिवस गरीब गरजू कुटुंबाना तांदूळ,बिस्किटे, संतूर साबण,मिठाची पिशवी याचे एक किट करून वाटण्यात आले त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला चेहऱ्यावर बांधण्यासाठी मास्क देखील देण्यात आले. यात चोपडा रोड वरील निर्वासित कुटुंबे,ताडेपुरा भागातील आदिवासी कुटुंबे यांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
सध्या मुस्लिम बंधू भागिनींचे रमजान महिन्यात रोजे सुरू आहेत या अनुषंगाने इमामनगर,गलवाडे रोड येथील मुस्लिम बंधू भगिनींना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच मास्क देखील देण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी सॅनिटाइझर ची गरजू व्यक्तींना फवारणी करूनच वस्तूंचे वाटप करण्यात आले. अत्यन्त शिस्तीत गर्दी न करता एका रांगेत शारीरिक अंतर पाळत सदर उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांनी मास्क आणि संतूर साबण उपलब्ध करून दिले.त्याच प्रमाणे प्रवीण गोसावी,सुरेश पाटील,योगेश चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.सॅनिटायझर फवारणी साठी योगेश चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी नूरखान पठाण, सुनील पवार,रोहित चव्हाण,अर्जुन सरोदे,मनोज पवार,पुनमचंद पारधी,राजेश पारधी इ उपस्थित होते.